Saturday, 18 September 2021

ओळखा स्वताला भाग -१

😊                                                               आनंद                                   

  कोणतेही काम करतेवेळी ,स्वीकारतेवेळी तुम्हास आनंद होतो का?मला होतो .एखादा सिनेमा पाहिल्यावर ,फिरायला गेल्यावर ,
    धकाधकीत गेलेल्या दिवसाच्या शेवटी रामीचे डाव टाकल्यावर या सर्व गोष्टींमधून मला आनंद मिळतो."काय केल्याने आनंद मिळेल ?"असे कोणलाही  विचारायची आवश्यकता नसते.कशाने आनंद येईल याचा निर्णय आपले मन घेते.तेच एखादे काम करण्यासाठी उपयुक्त करते.आपल्या विचाराच्या पातळीवरून आपल्या आनंदाची पातळी ठरवली जाते.असाविचार करण्याच्या प्रक्रियेनुसार त्या प्रकारची कामे करून वा स्वीकारून व्यक्ती त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करते.आपल्याला सर्व विषयांवर विचार करण्याची संधी असते,पण आनंद या विषयावर आपण विचार करतो का? सहज आठवून पहा आपण कोणकोणत्या विषयांवर विचार करतो.
                                                   आनंद हा एक अनुभव आहे, तो अनेक प्रकारचा असतो-जसे मानसिक,लौकिक,साहित्यिक,वाचन ,
लेखन यातून आनंद मिळतो, तसे वरील उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रक्रियेतून आनंद मिळतो.काही वेळ विषय,वेळ-काळानुसार
आनंद कमी जास्त प्रमाणात बदलतो. तसा त्याचा अनुभव कमी जास्त येतो.लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींमधूनमिळणारा आनंद पुढे वय वाढल्यावर जाणवत नही. बदलेलं वय हे त्यामागच कारण असत;तसेच प्रत्येक प्रकारचा आनंद  काही वेळ, काही क्षण एवढ्या-
ठराविक वेळेपुरातच टिकतो;अस असल तरी तो काही क्षणांचा आनंद,तो क्षणिक अनुभव आयुष्यभरासाठी लक्षात राहतो.एवढच नव्हे,
तर माणूस त्या आठवणींच्या सोबतीनच पुढच आयुष्य जगतो.
        
                                                      अस समजतात की माणसाला त्याच्या कामामधून वा कर्तुत्व दाखविताना आनंद  मिळतो.
कर्तुत्वाचा प्रकार जसा असेल त्यानुसार आनंद असेल. एखाद्या व्यक्तीस त्रास देऊन आनंद मिळविता येत नही.अर्थात तसा आनंद  
मिळवणारेही महाभाग या जगात असतात. दुसर्याला कामांत मदत करून,त्याच दुख,त्रास कमी करण्यान जी प्रतिमा निर्माण होईल
त्यामुळे दोघांनाही आनंद मिळेल.आनंद निर्माण करण हे व्यक्तीच्या आयुष्यातील वृत्तीवर अवलंबून असते.लहानपणी मुलांना हसण,
खेळण या प्रक्रियातून आनंद मिळतो. विद्यार्थीदशेत' अभ्यासातील यश,वा प्रावीण्य दाखविल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्रानुसार 
आनंद मिळेल, एखाद्यास बक्षीस मिळाल्यास आनंद होईल.एखाद्या व्यक्तीस एखाद्या परीक्षेत चांगले गुण मिळाले वा उत्तीर्ण झाल्यास एक निराळाच आनंद मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण खूप येऊ शकतात.एखाद काम 
उत्कृष्टरीत्या पार पडल्यास मिळणारी शाबासकी,वार्षिक पगारवाढ , विशेष बढती वा उच्च पदावर नियुक्ती या कारणांमुळे आनंद
प्राप्त होतो. हा आनंद फक्त त्या व्यक्तीसाठीच नव्हे ,तर कुटुंबातील अनेक व्यक्तीस एकाचवेळी उपभोगता येतो.
                                                      स्त्रियांना  सणासुदीला वा कधीही नवे कपडे,साड्या वा दागदागिने यांच्या खरेदीतून आनंद
मिळविता येतो. बऱ्याच स्त्रिया महागड्या वस्तूंची खरेदी करून व ती इतरांना दाखवून आनंद मिळवितात (खर अशा  प्रसंग इतरांस
कमी लेखून त्या आनंद मिळवितात.) प्रत्येक व्यक्तीची आनंद मिळविण्याची स्वतःची एक पद्धत असते. नवनवीन गोष्टी खरेदी कर-
ण्यातला आनंद काही वेळा  एवढा  वाढतो की (त्यांस आसक्ती म्हणावं हव तर ) आपण जरुरीपेक्षा अधिक वा अनावश्यक वस्तूंची 
खरेदी करतो. कधी कधी मोकळा वेळ हताशी असेल ,तेव्हा आपल्याच घराला भेट देऊन ,आपल्या कपाटांमध्ये डोकावून पहा ,
तीऱ्हाइताच्या नजरेन  पहा ,एकाच प्रकारच्या असंख्य वस्तू ,अनावश्यक खरेदी केलेल्या  वस्तू आपणाकडे पाहत असलेल्या दिसतील.
                                             गेल्या वर्षी अशाच एका प्रसंगातून मला आनंद मिळविता आला.नेदर्लंड या देशातून २४ वर्षीय  एक मुलगी पुण्यात आली होती. एका सामाजिक संस्थेच्या  कार्यक्रमात असताना तीन माझी ओळख करून घेतली. ती पीएच.डी.कर-
ण्यासाठी पुण्यात एक दोन वर्ष राहणार होती. माझ्याकडून काही शैक्षणिक संस्थाना भेट देण्याच्या कामी तिला माझ मार्गदर्शन हव 
होत. एकदा प्रत्यक्ष भेट करून झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही भेटलो, त्या कार्यक्रमातून तिला हवी असलेली माहिती व ती उपयोगी ठरली अस तिन सांगितल.माझ्याकडे होत्या त्या माहितीतून तिला योग्य ते मार्गदर्शन मिळाल व मला त्यातून समाधान मिळाल.

                                                                    ****************************************          
                    

No comments:

Post a Comment